पुणेमहाराष्ट्र

प्रा. प्रविण पोतदार यांना पीएच. डी.

प्रा. प्रविण पोतदार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मानव्य विद्याशाखेतील अर्थशास्त्र विषयाची पीएच. डी. जाहीर झाली. त्यांनी “महाराष्ट्रातील पुणे आणि लातूर जिल्ह्यतील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे तुलनात्मक अध्ययन” (२०१०-२०११ ते २०१९-२०२०) या विषयावर विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला. मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मेघना भोसले यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील अर्थशास्त्र संशोधन केंद्रात त्यांनी संशोधन पूर्ण केले. नुकत्याच ऑनलाइन झालेल्या मौखिक परीक्षेसाठी अध्यक्ष डॉ. संगीता साळवे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. विलास आढाव उपस्थित होते तर बहिस्थ परीक्षक म्हणून परभणी येथील बी. रघुनाथ महाविद्यालयाचे डॉ. सुरेश मेहत्रे यांनी काम पाहिले.
प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी डॉ. अशोक ससाणे, यांनी प्रा. प्रविण पोतदार व मार्गदर्शक डॉ. मेघना भोसले यांचे अभिनंदन केले.