पुणे (प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या असंघटित कष्टकरी, कामगार, शेतकरी सेलच्या पुणे शहराध्यक्षपदी बाळासाहेब भिसे यांची निवड करण्यात आली.
नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले.
शिवाजीनगर पक्ष कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ही नियुक्ती करण्यात आली.
हडपसरचे बाळासाहेब भिसे हे कष्टकऱ्यांचे नेते व शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारांचे अतिशय प्रामाणिक काम केले होते, हडपसर शेवाळवाडी मार्केटमधील कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भिसे यांनी सतत संघर्ष केला होता, त्यांच्या कार्याची दखल घेऊन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संपूर्ण पुणे शहरात असंघटित कामगार, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी संधी दिली.
असंघटित कष्टकरी कामगार व शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सतत अग्रेसर असतो, बाळासाहेब भिसे यांच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरातील व उपनगरातील कष्टकऱ्यांचे हित जोपासले जाईल व त्यांना पक्षासोबत जोडले जाईल.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
जबाबदारी मानून निष्ठावंतपणे काम करणार…
आजवर हडपसर व शेवाळवाडी परिसरातील असंघटित कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली हे पद नसून जबाबदारी मानून कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे व शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढविणार व शिरूर लोकसभा आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आणणार.
बाळासाहेब भिसे
नवनिर्वाचित शहराध्यक्ष – असंघटित कष्टकरी, कामगार, शेतकरी सेल – पुणे