पुणेमहाराष्ट्र

लोणी काळभोर येथे वीजचोरीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधि -स्वप्नील कदम

लोणी काळभोर – लोणी काळभोर येथे बेकायदा वीज जोडून साडेतीन लाख रुपयांची वीज चोरी करणाऱ्या पोल्ट्री चालकावर लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विजय काळभोर (रा. लोणी काळभोर) असे वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोल्ट्री चालकाचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय ३३) यांनी फिर्याद दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या लोणी काळभोर कार्यालयाकडून वीज बिल थकबाकी वसुली करणे, वीजचोरी शोधणे, पी. डी. ग्राहकांकडून थकबाकी वसुली करणे, अशी कामे केली जात आहेत. या कामांतर्गत सहाय्यक अभियंता नरवडे व कर्मचारी सीताराम चौधरी हे लोणी काळभोर हद्दीतील वडाळे वस्ती परिसरातील वीज बिलांची वसुली करत होते. त्यावेळी त्यांना विजय काळभोर हे त्यांच्या पोल्ट्री साठी वीज चोरी करून वापरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वीज चोरी करून महावितरणचे २ लाख ९६ हजार ६२९ रुपयांचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले त्यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी थकबाकी न भरता त्यांनी बेकायदेशीररीत्या वीज जोड केली होती. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार केतन धेंडे करत आहेत.