पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामार्फत पक्षांना अन्न, पाणी व निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी, टाकाऊ वस्तूंपासून कृत्रिम घरटे, पाणी व धान्य ठेवण्याच्या वस्तू बनविण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत महाविद्यालयातील ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर कार्यशाळेची माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले की, “दिवसेंदिवस वाढत असलेला उन्हाळा व शहरातील पक्षांचे कमी होणारे प्रमाण पाहता पक्षी संवर्धन उपक्रम आयोजित करणे आवश्यक आहे.
याचा विचार करून प्राणीशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. प्रशिक्षण कार्यशाळेत पक्षांसाठी अन्न, पाणी व निवाऱ्यासाठी बनविलेले ४०० घरटे व फिडर महाविद्यालय परिसर व शहरातील विविध भागात लावण्यात आले आहेत. शहरात पक्षांसाठी लावलेल्या घरट्याची व फिडर ची निगा संपूर्ण उन्हाळा संपेपर्यंत घेतली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया कार्यशाळेचे प्रशिक्षक डॉ. शरद गिरमकर यांनी दिली. कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून डॉ. अंजु मुंढे व डॉ. महेश जोशी यांनी काम पाहिले तर श्री संदिपान पवार, श्री नारायण खोमणे व संजय पवार यांनी संपूर्ण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी व पक्ष्यांचे घरटे व फिडर बनविण्यास मदत केली. विद्यार्थ्यांनी बनवलेले फिडर महाविद्यालय परिसरात मा . प्राचार्य नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ . शुभांगी औटी, डॉ. गंगाधर सातव, श्री संजीव घुले व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले.