पुणेमहाराष्ट्र

हडपसरमध्ये एका सदनिकेत आग; दलाकडून आगीवर नियंञण

पुणे – आज दिनांक ०३•०३•२०२४ रोजी दुपारी ०१•४४ वाजता हडपसर, अमनोरा पार्क येथे मागील बाजूस असणारया सॉलिटियर वाधवा या अकरा मजली इमारतीत एक सदनिकेत आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून हडपसर व बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, इमारतीच्या दुसरया मजल्यावर सदनिका क्रमांक चार मध्ये आग लागली होती. तसेच सदर सदनिका आग लागली त्यावेळी सदनिकेत कोणी नसल्याने बंद अवस्थेत होती. त्यानंतर सदनिकेचे मालक यांनी चावीच्या साह्याने मुख्य दरवाजा उघडला असता आग मोठ्या स्वरूपात असून त्यामुळे धुराचे प्रमाण ही जास्त असल्याचे जाणवले. दलाच्या जवानांनी तातडीने आतमध्ये कोणी नसल्याची खाञी करत आगीवर पाण्याचा मारा सुरु करत आग शेजारील इतर सदनिकेत पसरणार नाही याची दक्षता घेत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवून आग पुर्ण विझवली. सदर ठिकाणी दलाची मदत पोहोचण्यापुर्वी अमनोरा पार्क येथील एक अग्निशमन वाहन त्याठिकाणी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न करीत होते. सदनिकेत आग ही इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सुदैवाने कोणी ही जखमी वा जिवितहानी झाली नाही. घटनेवेळी इमारतीत असलेली स्थायी अग्निशमन यंञणा कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले. या आगीत गृहपयोगी साहित्य तसेच लाकडी सामान व विद्युत उपकरणे जळाली असून मोठे नुकसान झाले आहे.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड तसेच तांडेल अंबादास दराडे, वाहनचालक निलेश भोसले, चंद्रकांत जगताप व फायरमन दत्तात्रय माने, प्रदिप सावंत, वैभव भोसले, अनिल हाके, घुले यांनी सहभाग घेतला.