पुणेहडपसर

वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविणारे ७२ तासांत जेरबंद

हडपसर पोलिसांची कामगिरी ः

पुणे, दि. १५ ः चारवाडा, मांजरी, हडपसर परिसरात दरोडा टाकून वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरविणाऱ्या दरोडेखोरांना हडपसर पोलिसांनी ७२ तासांत जेरबंद केले. प्रेम सुरेश पाथरकर (वय १९, रा. बेबेढोहळ सोमाटणे फाटा, ता. मावळ), अमर उत्तम शिंदे (वय २३), राज नाथा भोते (वय २१), रोहित रामा खंडागळे (वय २१), संतोष तय्यप्पा जाधव (वय २०, सर्व रा. परंदवडी ठाकरवाडी, ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी सांगितले की, मांजरी चारवाडा येथे डिलिव्हरी बॉयला लुटलेल्या आरोपींचा तांत्रिक विशेषणाद्वारे तपास करून अटक केली. आरोपींकडे चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून दोन दुचाकी, फोन, चार धारदार कोयते हस्तगत करण्यात आले. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत.
पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षिका (गुन्हे) मंगला मोढवे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजितवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अमोल जाधव, प्रदीप क्षीरसागर, राजेंद्र करंजकर, विराज ढाकणे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.