वाहनं आणि गर्दीचा गोंगाट यामुळे चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मोबाईल टॉवर्स मुळेही चिमण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. पाणथळीच्या जागा नष्ट झाल्याने पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसत नाहीत. जंगल तोडीमुळे चिमण्यांची घरटी नष्ट होतात.२०मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
त्यासाठी आपण पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती केली पाहिजे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून दिले पाहिजे. उरलेले अन्न पक्षांना टाकले पाहिजे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवले पाहिजे. अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.उन्हाळा सुरू झालाय,अंगाची लाही लाही होतेय.सारेच प्राणी,पक्षी तहानेने व्याकूळ होताहेत. प्राणी ,पक्षी यांविषयी सहानुभूती हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजले पाहिजे,म्हणून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रीडानिकेतन, हडपसर या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिका सौ शीतल सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला हा उपक्रम- एक वाटी दाणे अन् एक वाटी पाणी -‘चिमणीसाठी’
सुधीर मेथेकर
ज्येष्ठ पत्रकार