पुणे – प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडवायचा आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पुणे शिरूर आणि काही प्रमाणात बारामती लोकसभा मतदारसंघात जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे रहा कुठेही गाफील राहू नका अशा सूचना शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवडणुकांचा कार्यअहवाल सादर केला, यावेळी पक्षाचे नेते आमदार भरत गोगावले उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे ही भाजपची अधिकृत जागा असून या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर शिरूर मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लवकरच उमेदवारी जाहीर होईल याशिवाय बारामती मतदारसंघातील बहुतेक मतदार हा पुण्याशी जोडला गेला आहे, त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात कशा पद्धतीने निवडणुकीच्या प्रचाराची आखणी करायची ते समन्वयातून इतर नेत्यांशी बोलून ठरवून घ्या येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची पुण्यात काय ताकद आहे हे दिसले पाहिजे प्रत्येक पदाधिकारी शिवसैनिक यांनी आपापल्या पद्धतीने कामाला लागावे पक्षाकडून सर्व ती ताकद पुरवण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न…
पुणे शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत, तिन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संपूर्ण ताकदीने महायुतीचे उमेदवारांच्या पाठीशी उभा राहून तीनही उमेदवार निवडून आणणार…
प्रमोद नाना भानगिरे
शहर प्रमुख – शिवसेना पुणे