पुणेमहाराष्ट्रहडपसर

घरफोडीतील आरोपीकडून साडेचार लाखांचे दागिने हस्तगत

हडपसर पोलिसांची कामगिरी ः
पुणे, दि. २० ः घरफोडीतील अटक केलेल्या आरोपीकडून चार लाख ३८ हजार रुपये किमतीचे ७८ ग्रॅम २७० मि.ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले. निहासलसिंग मन्नुसिंग टाक ऊर्फ शिखलकर (वय १९, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, दिलीप गुरव यांचे बंद घरफोडीची फिर्याद हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. तपासादरम्यान वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी निहालसिंग मन्नुसिंग टाक ऊर्फ शिखलकर याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

 

पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरिक्षिका (गुन्हे) मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, प्रवीण अब्दागिरे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजितवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.