उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख व शहर प्रवक्त्या विद्या होडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन येथे जाहीर प्रवेश केला. पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेना भवन येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ना. उदय सामंत पुण्यात आले असतांना हा प्रवेश करण्यात आला,
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मी शिवसेनेत प्रवेश केला असून पुण्यात शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणावर पक्ष संघटन बळकट झाले असून येत्या काळात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेची ताकद व पक्ष बांधणी मजबूत करून महिला आघाडीच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असे विद्या होडे म्हणाल्या.
यावेळी विद्या होडे यांच्या समवेत असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी शिवसेना पक्षाचे विभागीय संपर्क नेते संजय मशिलकर शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे ,अजय भोसले, किरण साळी रमेश बाप्पू कोंडे, उल्हास तुपे , लक्ष्मण अरडे , श्रीकांत पुजारी, निलेश माझिरे, सारिका पवार, शैला पाचपुते, पूजा रावेतकर, व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमोद नाना भानगिरे हडपसर मध्ये किंगमेकर…
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले प्रमोद नाना भानगरी यांनी शहर प्रमुख म्हणून मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेते पदाधिकारी आपल्या पक्षात घेऊन आपले स्थान मजबूत केले आहे, त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील उमेदवार असल्याने प्रमोद नाना भानगिरे किंगमेकर असतील अशी चर्चा आहे.