शिरूर (प्रतिनिधी – स्वप्निल कदम )
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पेठ पंचायत, मंचर पंचायत व कळंब पंचायत या भागात कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महायुतीचे सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ जिजाबा थोरात, शरद सहकारी बँकेचे संचालक विवेक वळसे पाटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष विष्णू काका हिंगे, अरुण भाऊ गिरे, रवींद्र भाऊ करंजखेले, निलेश स्वामी थोरात, दत्ता शेठ थोरात, सुहास बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सुषमाताई शिंदे, भाजपा आंबेगाव तालुका अध्यक्ष सतीश बानखेडे, बाळासाहेब शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंधरा वर्षे खासदार असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सर्वांगीण विकासासाठी काम केले प्रत्येक पंचायत समिती हद्दीत निधी देऊन तेथील विकास कामे करण्याचा त्यांनी सपाटा लावला होता मागील निवडणुकीत ते पराभूत झाल्याने पाच वर्ष विकास मागे राहिला त्यामुळे आगामी या निवडणुकीत आढळराव पाटील यांना पुन्हा निवडून द्या असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात केले.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावे व बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे, कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा खासदार होणार व येथील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार…
शिवाजीराव आढळराव पाटील
महायुती उमेदवार – शिरूर