पुणे

दिल्लीत आवाज उठवला पण माझ्या गावकऱ्यांना विसरलो नाही – शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नर तालुक्यातील दौऱ्यात आजी-माजी आमदार व पदाधिकाऱ्यांची साथ

पुणे प्रतिनिधी – स्वप्निल कदम
देशाची ध्येय धोरणे ठरवण्यात खासदाराची भूमिका महत्त्वाची असते मी पंधरा वर्षे खासदार म्हणून लोकसभेत या भागाचे प्रतिनिधित्व केले पण कधीही गल्लीत फिरणार नाही असे सर्वसामान्यांना कमी लेखणारी बेताल वक्तव्य केली नाही मी इथल्या गल्लीत फिरून लोकांच्या समस्याही सोडवल्या आणि दिल्लीतही आवाज उठवला असा उपरोधिक टोला शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला.
आढळराव पाटील यांच्या जुन्नर तालुक्यातील मॅरेथॉन दौऱ्यास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला या गाव भेट दौऱ्यात जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद, कांदळी, वडगाव, बोरी खुर्द, बोरी बुद्रुक, औरंगपूर अशा अनेक गावात वाजत गाजत त्यांचे स्वागत झाले.

याप्रसंगी जुन्नर चे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समिती सभापती संजय काळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना तालुकाप्रमुख सूर्यकांत ढोले, दूध संघाचे बाळासाहेब खिल्लारी, भाजपाचे भगवान घोलप, जिल्हा नियोजन समितीचे विकास दरेकर, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया लेंडे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढळराव पाटील पुढे म्हणाले मी संसदेत आपल्या भागाचे प्रश्न घेऊन योग्य पद्धतीने मांडणी केली समोरच्या उमेदवारापेक्षा कितीतरी जास्त प्रश्न सोडवण्याचे काम केले मात्र त्याचे अतिशय केली नाही सर्वसामान्यांनी ज्यांना आपला प्रतिनिधी म्हणून दिल्लीत पाठवलं त्यांनी दिल्लीत काम करताना तिथल्या जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम केले पाहिजे माझ्या दृष्टीने इथली जनता हेच माझे कुटुंब आहे गेली वीस वर्षे 800 हून अधिक जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवले.

खासदार झाल्यावर ‘खासदार आपल्या दारी’ उपक्रम सर्वप्रथम सुरू केला आणि प्रत्येक गावागावात भेटीतील या लोकांच्या अडचणी सोडवल्या या भागातील मोठे प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर त्यांच्या विचारांचा खासदार दिल्लीत गेला पाहिजे.

गेल्या पाच वर्षात खासदार नसताना आढळराव पाटील यांनी जमिनीवर राहून गावागावात राज्य शासनाकडून मोठा निधी आणला विद्यमान खासदारांना गावागावातून लोकांनी निधीसाठी निवेदन दिली मात्र त्यांनी कामे केली नाही त्यामुळे फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या सुखदुःखात अडीअडचणीत धावून येणारा खासदार आपल्याला हवा आहे.
अतुल बेनके – आमदार जुन्नर

 

खासदार नसताना देखील आढळराव पाटील सतत जनतेत वावरत राहिले लोकांची कामे करत राहिले म्हणून त्यांना आम्ही कधीच माजी म्हटलो नाही काही झालं तरी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सर्वसामान्यांसाठी 24 तास उपलब्ध असणारे खासदार म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील असून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आम्हाला आहे.
शरद सोनवणे
माजी आमदार जुन्नर