शिरूर मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहे ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल माझी शेवटची निवडणूक आहे जनतेने मला साथ द्यावी असे भावनिक आव्हान महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाईट येथील प्रचार सभेत केले.
पाईट (तालुका खेड) येथे आढळराव पाटील यांचा प्रचार दौरा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे शांताराम भोसले, कात्रज संचालक अरुण चांभारी, मंगल चांभारे, अरुण गिरे, शेखर शेटे, कल्पना गवारी, संध्याताई जाधव, कैलास लिंबोरे, अक्षय पहाड, प्रकाश वाडेकर, नंदाताई कड, विलास कातोरे, नवनाथ होले, मारुती सातकर, सुरेश शिंदे, सुगंधा शिंदे, मंदाताई शिंदे, सुजाता पाचपिंड, लता गोपाळे, नामदेव गोपाळे, भगवान प्रीतम शिंदे, मनीषा पवळे, अमिना पावसे, नसीम पठाण हनुमंत कड सुभाष होले जयसिंग दरेकर सिद्धार्थ कांबळे, सागर सातकर, पप्पू बनसोडे, सौरभ गव्हाणे, उल्हास कुडेकर, वैभव नाईकडे, विजय कांबळे, वैशाली पवले, कांचनताई सूर्यवंशी, यांच्यासह पाईट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तीनदा खासदार झालो मतदार संघातील अनेक विकास कामे करायची आहेत, मोठे गरजेचे रस्ते, चाकण वाहतूक कोंडी, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, रोजगार निर्मिती यांसह आवश्यक विकास कामे त्यासाठी 45 हजार कोटी रुपयांची गरज आहे म्हणून मला लोकसभेत जाणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा निधी आणायचा आहे मतदारसंघाचे नंदनवन करायचे आहे.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या संस्थानिक नेत्यांची जोरदार भाषणे झाली.
मनसे, शिवसेना, एकत्रित राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी असे पाच पक्ष फिरून आल्यावर केंद्रीय मंत्री अमित शहांचे दार ठोठावणारे तुम्ही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथविधीला हजर राहून आम्हाला मिठ्या मारणारे पण तुम्हीच, आम्हाला निष्ठा शिकू नका ज्या जनतेने जीवाचे रान करून निवडून दिले त्यांच्याशी प्रतारना केली मग खरा गद्दार कोण?
दिलीप मोहिते पाटील
आमदार खेड आळंदी