पुणे

“शिरूर लोकसभा मतदरसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून प्राचार्य डॉ.अन्वर शेख यांना उमेदवारी जाहीर… “डॉ.अन्वर शेख यांचा फटका महायुती की महाविकासआघाडी उमेदवाराला मतदारसंघात चर्चा…

पुणे प्रतिनिधी (स्वप्नील कदम)

वंचित बहुजन आघाडी पक्षाकडुन शिरूर लोकसभा मतदार संघासाठी पै.मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. परंन्तु देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पै.मंगलदास बांदल यांची जाहीर झालेली उमेदवारी अचानक रद्द करण्यात करण्यात आली.
शिरूर मधून प्रकाश आंबेडकर कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागलेली असताना वंचित बहुजन आघाडीकडून प्राचार्य डॉ.अन्वर शेख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिरूर लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढण्यासाठी सज्ज असलेले प्राचार्य डॉ.अन्वर शेख यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेवुन चर्चा केली होती. तसेच आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडुन शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले होते.
उच्चशिक्षित असलेले डॉ.अन्वर शेख यांनी पुना महाविद्यालयात प्राचार्य म्हणुन अतिशय प्रभावी असे कामकाज पाहिले आहे. त्यांचा शिक्षण क्षेत्रात अतिशय दांडगा अनुभव व अभ्यास आहे. त्यांचे विशेष कार्य म्हणजे झोपडपट्टीतील वंचित, गरीब, गरजू, पाचवी, सातवी तसेच नववी नापास मुलांना थेट दहावीची परीक्षा देऊन त्यांचा अभ्यास आणि तयारी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीकडुन प्राचार्य डॉ.अन्वर शेख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचे कौतुक करून अभिनंदन होत आहे.

 

वंचित आघाडीच्या उमेदवाराचा नेमका फटका कुणाला…
शिरूर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे, हा मतदार ज्यांच्या बाजूला झुकेल त्यांची दावेदारी पक्की मानले जात आहे त्यातच शरद पवार यांनी डॉ.अमोल कोल्हे यांच्यासाठी तर अजित पवार यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मुस्लिम समाजाच्या मतदानाकरिता मोठी ताकद लावली आहे, त्यातच मुस्लिम समाजातून उच्चशिक्षित व्यक्तिमत्व डॉ.अन्वर शेख यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा नेमका फटका कोणाला बसणार याची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात रंगली आहे.