पुणे

“महायुती घटक पक्षांचे भव्य शक्ती प्रदर्शन, कार्यकर्त्यांचा अफाट उत्साह… “महायुती उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजपा, मनसे, रासप, आरपीआय, रयत क्रांती संघटना, महायुतीची शिरूर लोकसभा मतदार संघ (३६) साठी अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे नामनिर्देशन पत्र दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या घटक पक्ष व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले

माहिती उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा नाम निर्देशन उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, जिल्हा परिषद माजी गटनेत्या आशाताई बुचके, युवा नेत्या पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील, माजी सभापती मंगलदास बांदल, मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर, अक्षय आढळराव पाटील, अपूर्व आढळराव पाटील, माधुरी आढळराव पाटील, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे व शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीतील सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यकर्त्यांच्या बळावर शिरूरमधून माझा विजय निश्चित….
शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अंगावर घेतली आहे, जीवाची बाजी लावून सर्वजण प्रचार करत आहेत, पंधरा वर्षात मी खासदार असताना केलेली विकास कामे, माझा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क व मतदारांच्या आशीर्वादाने पुन्हा लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाणार, खासदार झाल्यावर मतदार संघातील रखडलेले प्रकल्प पुढील पाच वर्षात मार्गी लावणार.
शिवाजीराव आढळराव पाटील
महायुती उमेदवार
शिरूर लोकसभा