पुणे (प्रतिनिधी )
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर दौरा दरम्यान पाबळ येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले माता-भगिनींनी औक्षण केला. श्री हनुमान व गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आणि 1500 मताचे भरघोष मताधिक्य देवून तुम्हाला विजयी करु, असा पाबळकरांनी दाखवला नागरिकांचा हा प्रतिसाद आढळरावांना विजयाची हमी देणारा ठरत आहे.
लोकांच्या गाठीभेटी घेऊन आणि समस्या जाणून आज दोरा यशस्वी झाल्याची समाधान वाटत आहे. बारा दिवसानंतर आपले प्रश्न कोण सोडवणार यासाठी आपण मतदान करणार आहोत.
तत्पूर्वी आपण ज्याला निवडून दिले, त्यांनी आपल्या किती अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, तपासणी तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्ही निवडून गेले. ज्या मुद्द्यावर एक शब्द बोलत नाही. ही सरळ सरळ फसवणूक आहे. आता नवीन मुद्दे काढले जाते प्रश्न निर्माण केला जातो महागाई अमुक तमुक प्रश्न काढून रडायचं होतं तर मग तुम्हाला निवडून का दिले? तर उत्तर येते संसद गाजवली भाषणा केली. त्याने प्रश्न सुटतो का दुसऱ्या बाजूला मी आहे माझे काम आहे तुम्ही पुर्वी पाहिला आहे. पदावर नसतानाही भरपूर निधी आणला अनेक प्रकल्प योजना मला अमलात आणायचे आहेत. त्यासाठी मी केंद्रातून निधी आणण्यासाठी सक्षम आहे. तुमचे प्रश्न तुमच्या समस्या तुमच्या अडचणी ही माझी जबाबदारी असेल. असा ठाम विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थितांना दिला.
मागिल पाच वर्षाचा बँक लाँग भरुन काढायचा असेल तर शिवाजी दादा आढळराव पाटील शिलेदाराच्या भुमिकेत आपल्या समोर उभे आहेत. असे प्रदीप दादा वळसे पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी भीमाशंकर साखर कारखाना व्हाईस चेअरमन प्रदिप दादा वळसे पाटील, राकाँपा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, उपजिल्हाप्रमुख शिवसेना अनिल काशिद, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर शंकर जांभुळकर, जि.प. उपाध्यक्ष अरुण गिरे, उद्योजक प्रदीप साकोरे, उपाध्यक्ष भाजपा शिरुर भगवानराव शेळके, अध्यक्ष शिवसेना शिरुर रामभाऊ सासवडे, सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर, अध्यक्ष उद्योग आघाडी रविंद्र गायकवाड पाबळ गावातील मान्यवर भाजपा तालुकाध्यक्ष मारुती शेठ शेळके, जिल्हा परिषद सदस्य सविता ताई बगाटे, शिवसेना विभाग प्रमुख नामदेव पानसरे, माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी विजय पानसरे, व्हाईस चेअरमन सोसायटी संगीताताई सातव, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ भिमाजी बागटे,
सरपंच सचिन वाबळे, माजी सरपंच सोपानराव जाधव, पंचायत समिती सदस्य किशोर आप्पा पारखी, माजी अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अरुण चौधरी, माजी सरपंच रोहिणी ताई जाधव, खजिनदार शिक्षण प्रसारक मंडळ गोरक्षप्पा गावडे, माजी सरपंच भरत जाधव, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ कल्पेश थोरवे, माजी सरपंच संतोष जाधव, माजी उपसरपंच संजय चौधरी, माजी उपसरपंच सपना जाधव, माजी उपसरपंच मीरा नरे, उपसरपंच सुभद्रा बगाटे, उपसरपंच अर्चना जाधव,
तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.