शिरुर – लोकसभेच्या शिरुर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याच आव्हान दिलं होतं. त्यावर पुराव्यांचा ट्रेलर दाखवल्यावर आढळराव पाटलांनी हा आपल्याला घेरण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, कोल्हेंच्या कोणत्याच आरोपांना उत्तर देणार नसल्याचं सांगितलं. त्यावर डॉ. कोल्हे यांनी ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद झाल्याचं सांगत, आढळराव पाटलांचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय.
महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतय, असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले.
यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत, पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो, असं आव्हान दिले. हे आव्हान स्वीकारत डॉ. कोल्हे यांनी आजच्या शिरुर तालुक्याच्या दौऱ्यात, पाणबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा प्रश्न एकदा नव्हे तर दोनदा विचारल्याच, पुराव्यानिशी डॉ. कोल्हे यांनी दाखवून दिलं.
यानंतर लगेच आढळराव पाटील यांनी, हा सगळा आपल्याला डॉ. कोल्हे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायच नाही, असं सांगितलं. यावर कोल्हेंनी आढळराव पाटलांना चांगलचं धारेवर धरलं.
डॉ. कोल्हे म्हणाले की, सुरवातीलाच सांगितलं होतं, आव्हान दिल्यानंतर शब्द फिरवू नका. पण ट्रेलर बघितल्यावरच त्यांची बोलती बंद झाली. पानुबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा शिरूर लोकसभा मतदार संघाशी आणि विकासासाठी काय संबंध याच उत्तर त्यांनी द्यावं.
तीन टर्म विश्वास ठेवून संसदेत पाठवलं होत, मग कोणत्या कंपनीच भलं करण्यासाठी हे प्रश्न विचारले, याच उत्तर आढळरावांनी द्यायला हवं.
आज सगळ्या सरड्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असेल इतक्या पटकन त्यांनी रंग बदलेत, असा टोला लगावत आढळराव पाटलांनी संरक्षण खात्याला आवश्यक असणाऱ्या सांधनांच्या खरेदी संदर्भातच प्रश्न का विचारलेत, याच उत्तर देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं उत्तर देणार नाही, अस म्हणून चालणार नाही, अशा शब्दात आढळराव पाटलांना जाहीरपणे सुनावलं आहे.