पुणे शहरामध्ये स्पा,मसाज पार्लर,ब्युटी पार्लर,च्या नावाखाली अनेक ठिकाणी अनाधिकृत व्यवसाय सुरू आहेत. अशी व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने सामाजिक सुरक्षा विभागाकडे निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले पुणे शहरांमध्ये अनेक ठिकाणी म्हणजेच कोरेगाव पार्क, विमान नगर, हडपसर, कोंढवा खुर्द, बुद्रुक, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन, जंगली महाराज रोड, फरगुशन रोड, कोथरूड, वडगाव बुद्रुक, धायरी, कात्रज, अशा अनेक पुणे शहरातील गजबजलेल्या पेठेच्या तसेच कॉलेजच्या, ठिकाणी ब्युटी पार्लर, स्पा मसाज, सेंटरच्या नावाखाली अनाधिकृत रित्या वेश्याव्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे पुणे शहरात गुन्हेगारी होत आहे अनेक तरुण-तरुणी व्यसनांच्या आहारी जाऊन गैरमार्गाचे अवलंब करीत आहेत.या व्यवसायामाघे अनेक श्रीमंत तसेच राजकीय लोकांचा वरदहस्त आहे. तसेच शहरातील अनेक गुंडांची या व्यवसायामध्ये भागीदारी आहे. शहरातील अगदी उच्चप्रूभ वस्तीमध्ये हे व्यवसाय मोठ्या दिमाखात सुरू आहेत.तरीसुद्धा स्थानिक पोलीस प्रशासन तसेच सामाजिक सुरक्षा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.अनेक वेळा याबाबत पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करून सुद्धा स्थानिक पोलीस स्टेशन कडे तक्रार करून सुद्धा काहीही उपयोग होत नाही.म्हणून पुणे शहर संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने येणाऱ्या काळामध्ये उग्र स्वरूपाचे निदर्शने, आंदोलने करण्यात येणार आहेत.
सामाजिक सुरक्षा विभागाला निवेदन देऊन विनंती वजा इशारा देण्यात आला आहे की आपण याबाबतची गंभीरतेने दखल घेऊन तात्काळ उपयोजना करावी. तसेच सुरू असणारे अवैद्य धंदे तात्काळ बंद करावेत. अन्यथा संभाजी ब्रिगेड त्यांच्या स्टाईलने कारवाई करेल.
विशेष बाब म्हणजे वडगाव या ठिकाणी फनटाईम पिक्चर थेटर च्या वरतीच स्पा विला नावाने मसाज सेंटर सुरू असून या ठिकाणी आमच्या ब्रिगेडच्या टीमने खात्री केली असता त्या ठिकाणी अनाधिकृत रित्या देशी आणि परदेशी महिलांकडून मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय करून घेतला जातो. त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करून मसाज सेंटर चालवणाऱ्यांवरती तसेच यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकावरती सुद्धा पिटाअंतर्गत,तसेच फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
पुणे शहरामध्ये चालू असणाऱ्या मसाज पार्लर ब्युटी पार्लर स्पा या विषयी अनेक पुरावे अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेड कडे शहरवासीयांनी नोंदवले आहेत.
याविषयी गंभीर्तने दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने त्या स्पावरती अनधिकृत चालणाऱ्या वेश्याव्यवसायावरती कारवाई करेल असे प्रतिपादन शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना केले.
यावेळी शहराध्यक्ष अविनाश मोहिते, प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, सचिव अर्जुन जागडे, कार्याध्यक्ष अविनाश घोडके, व्यंकट मानपिडी, मल्लेश मानपेडी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हडपसर परिसरात स्पा मसाज च्या नावाखाली गैरप्रकार….
पुणे पोलीस आयुक्तांनी पुणे शहर व उपनगरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना केलेल्या असताना, हडपसर परिसरात अवैध धंद्याचे स्तोम माजले आहे, स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असताना पोलिसांकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असताना पोलीस आयुक्तांचा फतवा हडपसर उपनगरासाठी नाही का असा सवाल नागरिक करत आहेत. असे अवैध स्पा चालवणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.