महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंढवा भागात रॅली व रोड शो करण्यात आला.
रोडशोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, ज्येष्ठ नेते जालिंदर कामठे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर प्रमुख म्हणून उपस्थित होते.
कोंढवा भागात आयोजित या रॅलीत माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेविका नंदाताई लोणकर, माजी स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, माजी नगरसेविका आरती बाबर, माजी नगरसेविका मनीषा कदम, माजी नगरसेवक वीरसिंग जगताप, नगरसेविका रंजना नानी टिळेकर, माजी नगरसेविका वृषाली कामठे, अभिमन्यू भानगिरे, सतपाल पारधे, रोहन गायकवाड, सुप्रिया शिंदे, सुनील कामठे, मदनराव शिंदे, नारायणराव लोणकर, अमित जगताप, पुजाताई झोळे, संदीपनाना बधे, डॉ.शंतनू जगदाळे, सतीश शिंदे, अमोल शिरस, बाळासाहेब भाऊ कामठे, अक्षय मदनराव शिंदे, बजरंग वाघ, शामराव मरळ, चेतन टिळेकर, जया बोरा, उद्यसिंग मुळीक, कल्पनाताई मुळीक, प्रकाश कदम, राजाभाऊ कदम, अजित जोशी रँलीस आदी महायुतीचे पादाधिकारी व नेते उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ रॅलीचे (रोड शो) फटाके फोडून वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. जागोजागी दादांवर पुष्पवृष्टि करण्यात आली.
कोंढवा, लुल्लानगर, साळुंखे विहार, कौसरबाग, कात्रज गावठाण, कात्रद चौक, सुखसागर नगर, कोंढवा बुद्रूक नगर, गोखलेनगर आदी परिसरात हा रोड शो झाला. दरम्यान या रोड शो ला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. सर्वांनी परिसरातून शिवाजी दादा यांना मोठे मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले. आमदार चेतन तुपे, योगेश टिळेकर, नाना भानगिरे, साईनाथ बाबर यांनी मतदार संघातून मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही दिली, घड्याळाला मतदान करुन आढळराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. असे आवाहन यावेळी सर्वांनी केले.
हडपसर भागातील महायुतीमधील सर्वं पदाधिकारी व कार्यकर्ते रँलीत उपस्थित होते. अनेक ठिकाणी अजितदादा पवार व शिवाजीराव आढळराव यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
हडपसर विधानसभा मतदारसंघ निर्णायक मताधिक्य देणार…
हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचारामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला महायुतीमधील एकजूट व सर्व नेत्यांनी केलेला प्रचार, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद या बळावर हडपसर विधानसभा मतदारसंघात निर्णय मताधिक्य मिळणार असल्याने मी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून जाणार, शिरूर मतदार संघातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार.
शिवाजीराव आढळराव पाटील
शिरूर लोकसभा – महायुती उमेदवार