नारायणगाव : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी परिवारासह आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानासाठी निघण्यापूर्वी कोल्हे यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर कोल्हे मळ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
डॉ. कोल्हे म्हणाले की, रात्रभर अनेक ठिकाणाहून पैसे वाटप होत असल्याचा तक्रारी आलेल्या आहेत. मात्र, पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही. विरोधकांवर जेव्हा अश्या पध्दतीने मतं विकत घेण्याची वेळ येत असेल तर चित्र स्पष्ट आहे.