संभाजी ब्रिगेड पुणे यांच्या वतीने सकाळी नऊ वाजता डेक्कन येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची पुणे ही कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. राष्ट्रमाता राजमाता,मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,व छत्रपती संभाजी महाराज, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. याच पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी दोन्हीही छत्रपतींना प्रशिक्षित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी वरती झाला तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर या किल्ल्यावरती झाला. म्हणून या दोन्ही छत्रपतींचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी छत्रपतींचा जॉज्वल्य इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक मुखाने पुणे जिल्ह्याचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यासाठी आवाज उठवला पाहिजे.पुढाकार घेतला पाहिजे.यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने लवकरच मागणी करण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले.
प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी नवव्या वर्षी संस्कृत भाषेचे ज्ञान अवगत केले 14 व्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकही लढाई हरलेली नाही. म्हणून अशा महान नायकाला आपण विसरता कामा नये. त्यांचे आचार आणि विचार तरुण तरुणींनी आत्मसात केले पाहिजे राष्ट्रसेवा, समाजसेवा,मातुनिष्ठा, आणि पितृनिष्ठा, हे गुण आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून घेतले पाहिजे त्यांना अभिप्रेत असणारा समाज आपण घडवला पाहिजे. म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना उजाळा आपण दिला पाहिजे. अभिवादन केले पाहिजे,वंदन केले पाहिजे. असे मत यावेळी त्यांनी प्रकट केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे सर प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते जिल्हाध्यक्ष उत्तम कामटे अविनाश घोडके व्यंकट मानपिडी मल्लेश मानपीडी प्रदीप घोडके वैभव घोडके संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.