पुणे

“लोकसभा निवडणूक झाली अन विधानसभेची तयारी सुरु… “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आभार मेळावा घेऊन प्रशांत जगताप उतरले हडपसरच्या मैदानात…

पुणे (विशेष प्रतिनिधी )
शिरूर लोकसभा मतदारसंघात हडपसर विधानसभा मतदारसंघाची धुरा सांभाळणारे प्रशांत जगताप यांनी नुकताच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा स्नेह आभार मेळावा घेतला, निष्टेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे, पक्ष फुटूनही निष्ठावंतांच्या जोरावर चांगले यश निवडणुकीत अपेक्षित आहे, अद्याप लोकसभेचा शेवटचा टप्पा बाकी असताना येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाने हडपसर मध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, शरद पवार यांचे निष्ठावंत डॉ.अमोल कोल्हे महाविकासआघाडी कडून रिंगणात होते, हडपसर मतदारसंघाची धुरा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हाती होती, बारामती, पुणे येथे चांगला संवाद ठेवत जगताप यांनी बेस्ट परफॉर्मन्स दिला, त्यातच पक्षफुटी झाली असताना दिग्गज नेते पदाधिकारी, माजी नगरसेवक अजित पवारांच्या सोबत गेले असताना या वयात शरद पवार यांना एकटे सोडणार नाही अन भाजप बरोबर जाणार नाही अशी भूमिका घेत प्रशांत जगताप यांनी पुणे शहरात एकाकी किल्ला लढवीला त्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळाली, याची अनुभूती लोकसभा निवडणुकीत तीन मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिसून आली.

हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मागच्या विधानसभा निवडणुकीत चेतन तुपे हडपसर मधून 2800 मतांनी निवडून आले, त्यांना शिवसेना व काँग्रेसची मोलाची साथ मिळाली, पक्ष फुटल्यावर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले, सत्तेत राहून निधी मिळेल अशी अपेक्षा ठेवली, प्रत्यक्षात पाच वर्षात हडपसर मध्ये निधी आणता आला नाही त्यामुळे मतदारांमध्ये नकारात्मक वातावरण दिसून येते, त्यातच हि हक्काची जागा असल्याने प्रशांत जगताप यांनी आधीच शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना भेटून हडपसर मधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले त्यावर पवार साहेबांनी तयारी करा सांगितल्याने जगताप यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे.
लोकसभेचा निकाल सकारात्मक लागेल अन डॉ. अमोल कोल्हे निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे, मागील पंचवार्षिकची पुनरावृत्ती करत लोकसभा अन विधानसभा मतदारसंघ खेचून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांचा आहे, निवडणूक संपली सर्व पक्षीयांनी कार्यकर्त्यांना विसरले असताना प्रशांत जगताप यांनी वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात संगीत रजनी घेऊन पदाधिकारी स्नेह आभार मेळावा घेतला, यामुळे निवडणुकीच्या धावपळ मधून तेवढाच विरंगुळा झाला.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इन्कमिंग जोरात…
पक्षाचे दोन भाग झाल्यावर हडपसर मतदारसंघात विद्यमान आमदार, माजी नगरसेवक व पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले पॅन शरद पवार यांचा संघर्ष व निष्ठा पाहून पुन्हा पवार गटात इन्कमिंग सुरु झाले आहे, लोकसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर मधून आलेले माजी नगरसेवक पाहता हि संख्या आठ झाली आहे, अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा प्रवेश केल्याने अजित पवार गटाला ओहटी लागली आहे.