पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन प्रतिनिधी)
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री बारापर्यंतच शहरातील पब व बार बंद करण्याची मागणी पुणे शहर शिवसेनेने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.
रविवारी पहाटे कल्याणी नगर परिसरात हिट अँड रनच्या प्रकारात मद्यधुंद अवस्थेत आलिशान गाडी बेफामपणे चालवत तरुण-तरुणींना बेदरकार पद्धतीने उडविल्याबाबत कल्याणी नगर येथे गुन्हा नोंदविलेला आहे सदर अपघात हा रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब व बार संस्कृतीमुळे घडला असून पुणे शहरातील सार्वजनिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी शहरातील पब व बार संस्कृतीला आळा घालण्यात अत्यंत आवश्यक आहे शहरातील सर्व अधिकृत बार व पब हे रात्री 12 नंतर पूर्णपणे बंद असावेत जेणेकरून घडणाऱ्या घटना टाळता येतील अशी मागणी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन द्वारे करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्या बाबतही पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.
सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेना सचिव किरण साळी, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
कायद्याचा धाक असावा, पुणे सुरक्षित रहावे…
पुणे शहर संस्कृती व विद्येचे महार घर आहे राज्यातूनच नव्हे तर देश विदेशातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी व नोकऱ्यांसाठी येत असतात, रात्री अपरात्री चालू ठेवलेले पब बार यामुळे अपघात व गुन्हेगारी वाढण्याचा धोका निर्माण होतो, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रात्री बारानंतर पब व बार बंद ठेवावेत अशी आगरी मागणी निवेदन द्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
प्रमोद नाना भानगिरे
शिवसेना शहरप्रमुख – पुणे