पुणे

विठ्ठलराव शिवरकर महाविद्यालयाचा 12 वी वाणिज्य शाखेचा निकाल 90.91% व कला शाखेचा 66.67%

विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला व वाणिज्य शाखेचा निकाल मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता इंटरनेटद्वारे जाहीर झाला.वाणिज्य शाखेचा निकाल 90.91% तर कला शाखेचा निकाल 66.67% लागला. तर विद्यालयाचा सरासरी निकाल 77.78% लागला.
वाणिज्य शाखेत कुमारी शोभा दीपक कांबळे हिने 85.00% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कुमारी तनुजा भीमा पवार हिने 82.17% तर तृतीय क्रमांक कुमारी अश्विनी तिपन्ना बजेत्री हिने 79.33% मिळवून सुयश प्राप्त केले.
तसेच कला शाखेत कुमारी दीपाली लक्ष्मण ढगे हिने 71.17% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक कुमारी विशाखा विजय भालेराव हिने 50.83% तर कुमारी प्रतिक्षा नारायण सोरगे हिने 50.33% मिळवून सुयश संपादन केले.

याप्रसंगी श्रद्धा ससाणे, युवराज देशमुख, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, कल्पना पैठणे, अरविंद शेंडगे, या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर ( अध्यक्ष – विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, पुणे ), चंद्रकांत ससाणे सर (सचिव – विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, पुणे ), दत्तोबा जांभूळकर (सरपंच – वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट), सुनिल गायकवाड (माजी चेअरमन – सन्मित्र सह. बँक ), सुमनताई फुले ( माजी नगरसेविका – पुणे मनपा ), कविताताई शिवरकर (माजी नगरसेविका – पुणे मनपा ), अभिजित शिवरकर ( माजी नगरसेवक – पुणे मनपा ), सर्व संचालक मंडळ, प्राचार्य वाघुले सर, सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांच्या सुयशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले,तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.