पुणे

साधना विद्यालयाचा दहावीचा निकाल 99.38 टक्के

हडपसर वार्ताहर –  हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील 647 पैकी 643 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयाचा एकूण निकाल 99.38 % लागला.90 % पेक्षा अधिक गुण 25 विद्यार्थ्यांनी मिळवले.विशेष प्राविण्य 175 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 217 विद्यार्थी,द्वितीय श्रेणी 173 विद्यार्थी,तर तृतीय श्रेणी 78 विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. विद्यालयातील 2 विद्यार्थ्यांनी संस्कृत व गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले.

विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक नरूटे अमेय सदानंद 97.80 % ,द्वितीय क्रमांक पवार आदेश अनिल 97.00 % ,तृतीय क्रमांक भिंगले जयराज महादेव 96.40%
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन,आमदार चेतनदादा तुपे पाटील व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे ,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार
विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत, आजीव सेवक अनिल मेमाणे यांनी सर्व विषयशिक्षक, व सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.