पुणे

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाचा एसएससी मार्च 2024 चा सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल 96% तर मराठी माध्यमाचा निकाल 81.96%

विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस. एस. सी. बोर्ड मार्च 2024 चा निकाल सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता इंटरनेटद्वारे जाहीर झाला. सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल 96% तर मराठी माध्यमाचा निकाल 81.96% लागला.

सेमी इंग्रजी माध्यमातून कुमारी जैस्वाल सुप्रिया मदनलाल हिने 75.40% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कुमारी चव्हाण तनुजा मिलिंद हिने 73.80% तर तृतीय क्रमांक कुमारी बागवान रिया अब्दुल हिने 69.00% मिळवून सुयश प्राप्त केले.

 

तसेच मराठी माध्यमातून कुमारी जैस्वार शिल्पा संतलाल हिने 73.20% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक कुमारी शेख सकिना नसीम हिने 64.60% तर कुमार भालेकर युवराज सागर हयाने 63.00% मिळवून सुयश संपादन केले.
याप्रसंगी लहू वाघुले सर (मुख्याध्यापक ), गोरक्षनाथ केंदळे, वहिदा अवटी, मच्छिन्द्र रकटे, अरविंद शेंडगे, दीपाली मेरूकर, घनश्याम पाटील, आशा भोसले, दीपाली शिवरकर, नलिनी गायकवाड या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर ( अध्यक्ष – विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, पुणे ), चंद्रकांत ससाणे सर (सचिव – विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, पुणे ), दत्तोबा जांभूळकर (सरपंच – वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट), सुनिल गायकवाड (माजी चेअरमन – सन्मित्र सह. बँक ), सुमनताई फुले ( माजी नगरसेविका – पुणे मनपा ), कविताताई शिवरकर (माजी नगरसेविका – पुणे मनपा ), अभिजित शिवरकर ( माजी नगरसेवक – पुणे मनपा ), सर्व संचालक मंडळ, प्राचार्य वाघुले सर, सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांच्या सुयशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले,तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.