पुणेहडपसर

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साधना विद्यालयात वृक्षारोपण

हडपसर वार्ताहर. ‘मिशन लाईफ’ (LiFE) Lifestyle for Environment (पर्यावरणासाठी जीवनशैली) व माझी वसुंधरा (My Earth) हे अभियान भारत सरकारच्या पर्यावरण, वन मंत्रालय आणि हवामान बदल विभाग तसेच नीती आयोग यांच्यामार्फत राबविले जात असून या अंतर्गत ‘सर्व नागरिकांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे व त्यास प्रोत्साहन देऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे आवश्यक आहे, या उद्देशाने ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साधना विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वसुंधरेचे संवर्धन करण्याची “माझी वसुंधरा” ही शपथ घेतली. व वृक्षारोपण केले.

 

या कार्यक्रमाचे आयोजन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. धनाजी सावंत, कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख विजय सोनवणे, राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण विभागाचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत,नितीन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

 

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अनिल मेमाणे, शिक्षक दत्तात्रय टेंगले , विक्रांत जाधव, प्रताप गायकवाड,सचिन कुंभार व राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थी उपस्थित होते.