पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. सिरम इन्स्टिट्यूटच्या फलोद्यान विभागाचे प्रमुख धर्माकुमार नायडू यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाच्या असमतोलामुळे भारतात अनेक ठिकाणी निसर्गाच्या कोपच्या हिमालयातील बर्फ वितळन्याची घटना, केरळचा पूर अशा घटना घडत आहेत. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे धर्माकुमार नायडू यांनी सांगितले.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मानवी जीवन, पशुपक्षी प्राणी यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाचे असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे यांनी मनोगतात व्यक्त केले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे, उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, संजय घुले, डॉ. नाना झगडे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी एम. शिंदे , प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरद गिरमकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक ससाणे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख राजेश मोरे, डॉ. किरण रणदिवे, डॉ. सुनीता दानाई, डॉ. आकाश निंबाळकर, प्रा. नितीन लगड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद गिरमकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नाना झगडे यांनी केले तर आभार प्रा. अनिल जगताप यांनी मानले.