पुणे

“काँग्रेस पक्षाच्या हडपसर ब्लॉक महिला अध्यक्षपदी उर्मिला नितीन आरु यांची निवड”

हडपसर / पुणे (प्रतिनिधी )

हडपसर परिसरात मागील वीस वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये एक निष्ठेने काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या उर्मिला नितीन आरु यांची “हडपसर ब्लॉक महिला अध्यक्ष” पदी निवड करण्यात आली.
पुणे शहर जिल्हा महिला अध्यक्षा पूजा आनंद यांनी काँग्रेस भवन निवडीचे पत्र शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते देण्यात दिले.
उर्मिला आरु यांनी राज्याचे माजी बांधकाममंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची निवडणूक लढवली आहे. हडपसर परिसरातील सामाजिक राजकीय व धार्मिक कार्यात त्यांचा प्राधान्य पुढाकार असतो. काँग्रेस पक्ष संघटनेच्या वाढीकरिता व महिलेच्या हक्क सुरक्षेकरिता काम करणार असल्याचे उर्मिला आरु यांनी सांगितले. याप्रसंगी सीमा सावंत, सिंधू होले, इंदिरा तुपे, नंदा हिंगणे, पुष्पा गायकवाड, मनीषा होले, आशा हिंगणे, नेहा शिंदे आदी उपस्थित होते. उर्मिला आरु यांच्या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, हडपसर ब्लॉक कमिटी अध्यक्ष दिलीप शंकर तुपे व विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे, शिरूर मध्ये दाखविलेल्या एकीमुळे डॉ.अमोल कोल्हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत, आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी महिला संघटन करणार आहे, हडपसर मध्ये पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून काम करणार.
उर्मिला नितीन आरु
नवनिर्वाचित हडपसर ब्लॉक महिला अध्यक्षा