पुणे

“प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हडपसर मधील श्री साई अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश… “विद्यार्थ्यांचे करिअर घडवणारी संस्था – आनंद रायकर..

हडपसर (प्रतिनिधी)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हडपसर मधील श्री साई अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2024 बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
आई घरकाम तर वडील मजुरी करणाऱ्यांच्या रामटेकडी, वैदुवाडी, गोसावी वस्ती, शंकर मठ, म्हाडा कॉलनी या वस्तीस्तरांवरील विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्री साई अकॅडमीमध्ये शिक्षण व मार्गदर्शन घेऊन घवघवीत यश संपादन केले.

श्री साई अकॅडमीच्या एच.एस.सी. (HSC) विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक अल्फिया पटवारी 76.43% गुण प्राप्त केले द्वितीय क्रमांक इशिका पवार 64.83 % तृतीय क्रमांक सोहम मिरेकर 61 टक्के मिळविले.

एसएससी (SSC ) मध्ये प्रथम क्रमांक कुमारी सुहानी अलकुंटे हिने 81.20 टक्के गुण प्राप्त केले तर द्वितीय क्रमांक पायल मिरेकर हिने 80 टक्के गुण प्राप्त केले तर तृतीय क्रमांक प्रतीक्षा सेन हिने 74.60 % टक्के गुण प्राप्त करून सुयश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री साई अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आनंद रायकर, अर्चना रायकर, सागिरा शेख, वैष्णवी आदमाने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांना सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
श्री साई अकॅडमी संस्थेत ऍडमिशन घेण्यासाठी वैदुवाडी व हडपसर येथील संस्थेत 9373327148, 7972784023 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आनंद रायकर यांनी केले आहे.

 

आर्थिक परिस्थिती गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कार्य करतो अतिशय प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या कुटुंबांमध्ये विद्वत्ता असणारी मुले-मुली आहेत, त्यांच्या विद्वत्तेला न्याय देण्यासाठी श्री साई अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण व मार्गदर्शन केले जाते, अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याचे काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे.
आनंद रायकर
संस्थापक अध्यक्ष
श्री साई अकॅडमी