गेल्या काहीच दिवसांपूर्वी हडपसर मधील ससाणे नगर येथे असलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित केली, सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रमोद नाना भानगिरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची होणारी विटंबना ही अत्यंत निंदनीय व महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या भावना प्रक्षुब्ध करणारी आहे, महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण करणे ही शासनाबरोबरच आपली ही नैतिक जबाबदारी समजून महापुरुषांच्या होणाऱ्या विटंबनेच्या घटनेतून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व अशा प्रकारांनी समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो, अशा घटनांना कायमचा पायबंद घालावा म्हणून पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी भानगिरे यांनी केली.
घडलेल्या प्रकाराची संवेदनशीलता लक्षात घेऊन शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाभोवती सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात केली आहे, घडलेल्या प्रकाराचा जलदगतीने तपास करून तत्काळ समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.
आश्वासन न देता तत्काळ धावून येणारा नेता….
समाजविघातक घटना घडल्या किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर पोकळ आश्वासन न देता तातडीने धावून जाणारा व स्वखर्चातून वेळप्रसंगी लोकांना मदत करणारा नेता म्हणून प्रमोद नाना भानगिरे यांची ओळख आहे, ससाणेनगर येथे स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पुन्हा घटना घडू नये म्हणून तातडीने उपाययोजना केली, या कार्याबद्दल नाना भानगिरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.