तीन दिवसापासून बेवारस अवस्थेत पडलेल्या वयोवृद्ध नागरिकांचा उपचाराअभावी जीव गेला असता परंतु सामाजिक कार्यकर्ता बच्चूसिंग टाकच्या सतर्कतेमुळे या वयोवृद्धाला रुग्णालयात दाखल केल्याने वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला, बच्चूसिंग टाकच्या या कार्याबद्दल हडपसरमध्ये कौतुक होत आहे.
हडपसर पोलीस स्टेशन जवळ शौचालय शेजारी एक वयोवृद्ध बेवारस नागरिक बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता येथील पेपर विक्रेता बाळू ने ही बाब सामाजिक कार्यकर्ते शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष बच्चूसिंग टाक यांच्या कानावर घातली. तीन दिवस या बेवारस अवस्थेत पडलेले असताना हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असतानाही या वयोवृद्धाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत मिळाली नाही, बच्चूसिंग टाक यांना समजताच तातडीने त्यांनी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून वयोवृद्ध नागरिकास रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बच्चूसिंग टाकच्या तत्परतेमुळे या वयोवृद्ध नागरिकाचा जीव वाचण्यास मदत झाली.
या कार्यामुळे हडपसर परिसरात बच्चूसिंग टाक वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“आपत्कालीन काळात धावून जाणारा हडपसर मधील अवलिया…
मुठा मोठ्या कालव्यात हडपसर व पंचक्रोशीत घडणारे अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती झाली की बच्चूसिंग टाक हा पोलिसांच्या मदतीला मुलगा आझादसिंग टाक बरोबर तातडीने पोहोचतो, अशा गंभीर प्रसंगात कोणतीही तमा न बाळगता सडलेले, कुजलेले मृतदेह काढण्यास मदत करतो, आपत्कालीन प्रसंगात धावून जाणारा हा अवलिया पोलिसांचा दूत म्हणून काम करत असतो.