पुणेमहाराष्ट्र

महिलांचे सरकार, शिंदे सरकार’: पुण्यात शिवसेनेच्या महिला आघाडीचा जल्लोष

 

पुणे : पुण्यात महिला आघाडीच्या वतीने पावसाळी अधिवेशन २०२४ अर्थसंकल्पात महिला व तरुणींसाठी घेतलेल्या हिताच्या निर्णयाबद्दल शहरातील शिवसेना भवनच्या समोर ‘महिलांचे सरकार, शिंदे सरकार’चा जयघोष करीत, पेढे भरवीत महिलांसाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

राज्यभरात लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीची तैयारी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी, उमेदवारांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात सुरु केली आहे. तसेच नुकतेच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जून रोजी सुरु झाले व २८ जूनला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधान भवनात अधिवेशनादरम्यान २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये विविध वर्गांसाठी घेतलेले निर्णय, विविध योजना व भविष्यात राबवली जाणारी सरकारची धोरणे अशा अनेक महत्वाच्या गोष्टींचा समावेश होता. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला व मुली, विद्यार्थी व तरुण, वारकरी, दिव्यांग या वर्गांसाठी मुख्य निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये महिलांसाठी ‘मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी’ ही योजना जुलै महिन्यापासून सुरु केली जाणार आहे. याच महिलांसाठी घेतलेल्या, महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या निर्णयांचे स्वागत करत आज पुण्यातील सारसबाग जवळ असलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शहरातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून ‘महिलांचे सरकार, शिंदे सरकार’ असा एकच जयघोष करत जल्लोष करण्यात आला. यावेळी पुणे शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या सह संपर्क प्रमुख, सुदर्शना त्रिगुणाईत, महिला आघाडी शहर प्रमुख, श्रुती नाझीरकर, श्रद्धा शिंदे, नेहा शिंदे, सुरेखा कदम पाटील यांच्या समवेत इतर महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या.