पुणेमहाराष्ट्र

सराईत अफीम तस्करास अटी व शर्थीवर कोर्टाने केला जामीन मंजुर

प्रतिनीधी -स्वप्नील कदम

पुणे- धनकवडी व भारती विद्यापीठ भागातील सराईत गुन्हेगार व अफीम तस्कर जितेंद्र देवीलाल शर्मा रा. शेरगड राजस्थान यास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी होऊन आरोपीस येरवडा मध्यवर्ती कारागृह स्थानबद्ध कऱण्यात आले होते. आरोपी जितेंद्र शर्मा यावर यापूर्वी देखील राजस्थान राज्यातून अफीम तस्करी केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी हा सराईत व रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. दि.१९/0४/२०२४ रोजी आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अफीम घेऊन जाताना ताब्यात घेतले.

 

त्यानंतर आरोपी याने ॲड.आदेश चव्हाण, ॲड. धनंजय काळभोर , ॲड. विपुल अंदे , ॲड. सुलेमान शेख यांच्यामार्फत मा. जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे जामीन अर्ज दाखल केला. यावेळी पोलीस, सरकारी वकील यांनी आरोपीस जामीन न मिळण्यासाठी विरोध केला तदनंतर आरोपी यांचे वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.