महाराष्ट्रहडपसर

“वीज दरवाढीविरोधात पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंदोलन गोरगरीब जनतेला 300 युनिट पर्यंत विज मोफत द्यावी – आंदोलकांची मागणी

महाराष्ट्र सरकारने सामान्य जनतेचा विचार न करता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मार्फत वितरित करण्यात येणाऱ्या विजेचा दर वाढवले आहेत. आतापर्यंतच्या झालेल्या वीज दरवाढीमध्ये ही दरवाढ खूप मोठी आहे. जवळ जवळ 30 टक्के वीज दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांवर खूप मोठा आर्थिक बोजा पडला आहे. सर्वसामान्य जनतेच्या संसाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वीज दरवाढ बेकायदेशीर असून ती त्वरित मागे घेण्यात यावी.

 

तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही अनेक मार्गाने उत्पन्न मिळवत आहे. जसे री कनेक्शन चार्ज सिंगल फेजसाठी 366/- रू तर थ्री फेजसाठी 600/- रुपये आकारला जातो. स्थिर आकार देखील 118 रू वरून 138 रू युनिट प्रमाणे वाढविण्यात आला आहे. पूर्वीचा वीजदर आणि आता वाढवण्यात आलेला वीजदर 1ते 100 युनिट पर्यंत 4.41 रू वरून 4.71 रू, 101 ते 300 युनिट पर्यंत 9.64 पैसे वरून 10.29 रू, 301 ते 500 युनिट पर्यंत 13.61 रू वरून 14.55 रू, 501 ते 1000 आणि पुढे पर्यंत15.57 रू वरून 18.64 रू करण्यात आला आहे. हा चार्ज वाढवल्यामुळे एकूण वीज बिलामध्ये खूप मोठी वाढ होत आहे. तसेच झोपडपट्टी भागातील सिंगल फेजचे नवीन कनेक्शन हे पूर्वी 500 रुपये होते ते आता 1520 रुपये करण्यात आले. तसेच CRA च्या नावाखाली 8300/- रुपये उकळले जात आहेत. थ्री फेज लाईन साठी CRA 17500/- रुपये घेतला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात CRA लावण्याचे काय कारण आहे ? असाही प्रश्न महाराष्ट्रातील नागरिकास पडत आहे.

एखाद्या ग्राहकाने बिल भरला नाही अथवा विज बिल आले नाही म्हणून बिल भरण्यास उशीर झाला तरी कोणतीही पूर्वसूचना न देता आपण मीटर काढून घेता हे पूर्णपणे चुकीचे आहे व बेकायदेशीर आहे. आणि पुन्हा मीटर स्थापित करण्यासाठी दंड अथवा CRA भरावा लागतो. तसेच नवीन ग्राहकाला CRA भरून देखील आपण नवीन मीटर देत नाही. त्याउलट बाहेरून मीटर खरेदी करण्यास भाग पाडत आहात. त्याचीही किंमत 1000 ते 3000 रुपयांमध्ये आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी महाराष्ट्रातील नागरिकांचे अतोनात हाल करत आहे. हे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोळशाच्या खाणी आहेत त्या कोळशाचा खाणीचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो, असे असताना देखील महाराष्ट्राला खरेदी करण्यात येणारी विज जास्त दराची का आहे ?

इतर राज्यात उदाहरणार्थ दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये विजेचा दर कमी असून 1 ते 300 युनिट पर्यंत पूर्णपणे मोफत आहे. या सर्व गोष्टीकडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्यात उपाययोजना करावी. शिवसेना पुणे शहराच्या वतीने आपणास मागणी आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व वीज ग्राहकास आपण 1 ते 300 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी. तसेच स्मार्ट मीटर ही संकल्पना आपल्या विचाराधीन आहे. ती देखील आपण रद्द करावी. अन्यथा महाराष्ट्रामध्ये वीज वितरण कंपनीच्या विरोधात उग्र आंदोलन करू. तसेच CRA, दंड इन्फ्रास्ट्रक्चर, इत्यादी गोष्टींमुळे महाराष्ट्र राज्य वितरण मंडळाकडून होणारी लूट थांबवण्यात यावी. तसेच महाराष्ट्र राज्य वितरण मंडळातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारास रोखण्यासही तरतूद करण्यात यावी.
आंदोलनानंतर मराविविकं चे अधिक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता संजय गवळी हे अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी प्रवेशद्वारावर आले.

आंदोलन प्रसंगी मोठ्या संखेने पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, सहसंपर्कसंघटिका कल्पना थोरवे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, राजेंद्र शिंदे, उमेश वाघ, उत्तम भुजबळ, योगेश मोकाटे, किशोर रजपूत, राजेश मोरे, महेश पोकळे, माजी नगरसेवक संजय भोसले, जानू आखाडे, वसंत मोरे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, सनी गवते, युवराज पारिख, सागर गायकवाड, सागर दळवी, परेश खांडके, चिंतामणी मुंगी, अतुल गोंदकर, चंद्रशेखर जावळे, योगेश पवार, विलास सोनवणे, अनिल दामजी, नितीन निगडे, भगवान वायाळ, नागेश शिंदे, विजय नायर, चंदन साळुंखे, रुपेश पवार, नंदू घाटे, पंकज परदेशी, नागेश खडके, बाळासाहेब गरुड, परेश खांडके, दिलीप व्यवहारे, दत्ता खवळे, जान मोहम्मद , महेंद्र बनकर, सुरज मोराळे, झुबेर तांबोळी, दादा तुपे, प्रवीण रणदिवे ,अनिकेत सपकाळ, संतोष होडे , गौरव गायकवाड, सोमनाथ गायकवाड, जितू कदम, प्रवीण हिलगे, गिरीश गायकवाड, बाळासाहेब मेमाणे, मिलिंद पत्की, झुबेर शेख, निरंजन कुलकर्णी, संजय वाल्हेकर, दिलीप महादे, संजय लोहोट, राहुल शेडगे, सिध्दार्थ भालेराव

महिला आघाडीच्या ज्योती चांदेरे, रोहिणी कोल्हाळ, विद्या होडे, अमृत पठारे, निकिता मारटकर, सोनाली जुनावणे, मृण्मयी लिमये, अश्विनी मल्हारे, वैशाली कापसे, शीतल जाधव उपस्थित होते.