महाराष्ट्र

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिपळूण-संगमेश्वरला ६७ कोटींचा निधी मंजूर आ. शेखर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांना यश

चिपळूण : आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिपळूण-संगमेश्वरमधील धामापूर जि.प. गटाला १८ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ (बॅच-१) संशोधन व विकास अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी राज्य सरकारने आमदार शेखर निकम यांच्या मागणीनुसार ६६ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे ग्रामीण रस्त्याचा कायापालट होणार असून साधारणत: ४० किमीपर्यंत एकूण १३ रस्त्यांची कामे पुर्ण होणार आहेत.

 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ (बॅच-१) संशोधन व विकास अंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये १) कडवई विकास नगर ओकटेवाडी रस्ता – ३.३ किमी, २) गोळवली रोड शेंबवणे म्हादेवाडी तांबेडी रस्ता – ४ किमी,
३) कडवई घोसाळकरवाडी कुंभारखाणी बु. रस्ता – ३ किमी, ४) कर्ली गावठाणवाडी ते देवघर रस्ता – ४.१५० किमी, ५) रामा १७४ ते वायंगणे कोंड्रण रस्ता – ३.०५० किमी, ६) रामा १७ ते गोळवली ब्राम्हणवाडी खामकरवाडी करंडेवाडी देऊळवाडी दुधमवाडी राऊळवाडी रस्ता – ३.१२० किमी, ७) धामापूर मावळंगे मांडरकरवाडी आंबेट माखजन रस्ता – ३ किमी, ८) धामापूर भायजेवाडी रस्ता – ३ किमी, ९) कालुस्ते कर्जिकर मोहल्ला रस्ता – २.३०० किमी, १०) आकले कादवड कोंडावळे धनगरवाडी शाखेसह रस्ता – ३.१२५ किमी, ११) किरडुवे ते बारेवाडी रस्ता – २ किमी, १२) तेर्ये रस्ता ते मुचरी वाशी किंजळे तिवरे रस्ता – ३.३०० किमी, १३) इजिमा ३८ ते नारडुवे सड्येवाडी मधलीवाडी रस्ता – ३ किमी इ. कामांचा समावेश आहे.
महायुती सरकारने आपल्या मागण्या मान्य करून कोकणच्या विकासाला प्राधान्य दिल्याने आमदार शेखर निकम यांनी सरकारचे आभार मानले.