पुणे

“हडपसर विधानसभा मतदारसंघात दादा गटाच्या चेतन तुपे यांची बाजी? की भाई गटाचे प्रमोद भानगिरे यांचा जॅकपॉट? “महायुतीच्या जागावाटपाचा मुद्दा ठरणार कळीचा, हडपसर साठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला…

पुणे (अनिल मोरे)
हडपसर विधानसभा मतदारसंघातून पुण्याचे दादा व मुंबईचे भाई यांच्यात चांगलेच रस्सीखेच होणार असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील या विधानसभा मतदारसंघावर कोणाचे वर्चस्व राहणार? विद्यमान आमदार चेतन तुपे उमेदवारासाठी बाजी मारणार की शिवसेनेचे शहर प्रमुख प्रफुल नाना भानगिरेंसाठी मुख्यमंत्री सर्व शक्ती पणाला लावणार? यावर या मतदारसंघाची गणिते अवलंबून असणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटी नंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पुण्यातून माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी जाण्याचा निर्णय घेतला, भानगिरे यांच्यावर पुणे शहर प्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली, शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पुणे महापालिका व राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपये निधी नाना भानगिरे यांनी आपल्या मतदारसंघात आणला, तसेच मोठे प्रकल्पही सुरू केले मोहम्मद वाडी येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार भरवून नागरिकांची कामे मार्गी लावली, भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर विधान परिषदेवर निवडून गेल्याने प्रमोद नाना भानगिरे यांच्या विधानसभेच्या आशा वाढल्या आहेत, त्यातच केलेल्या कामाच्या जोरावर पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी हडपसर हा विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आग्रही आहे,

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांना सत्ता काळातही हडपसर मध्ये निधी आणता आला नाही, त्यातच त्यात त्यांच्या पक्ष बदलाच्या धरसोड वृत्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, साडेचार वर्ष विधानसभा मतदारसंघ ताब्यात असूनही कार्यकर्त्यांचेच प्रश्न सुटले नसल्याने मतदारांमध्ये असलेली नाराजी त्यांना भोवणार असल्याची चिन्ह आहेत, त्यामुळे जागा वाटपात हा मतदारसंघ राखण्यात यशस्वी होतात की शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे यांचा ‘जॅकपॉट’ लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

आमदार योगेश टिळेकर यांची भूमिका महत्वाची…
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांच्याकडून पराभूत झालेले योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर संधी मिळाली आहे त्यामुळे त्यांचा विधानसभेचा क्लेम आपोआप संपला असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते कोणाच्या बाजूने आपली शक्ती लावतात त्यावर पुढील आमदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. राजकीय साठमारीत विरोधी पक्षात असलेले पण सध्याच्या महायुतीतील विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा झेंडा हाती घेण्याची वेळ येऊ शकते.

 

प्रमोद नाना भानगिरे यांना मुख्यमंत्र्यांचा शब्द….
पुणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वास वाचलेले प्रमोद नाना भानगिरे यांच्यासाठी पुण्यातील आठपैकी एक हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत, त्यातच प्रमोद भानगिरे यांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्याने हा मतदार संघ सुटणारच असा कार्यकर्त्यांमध्ये सूर आहे, जर विद्यमान आमदारांनी कापून भानगिरे यांना उमेदवारी मिळाली विद्यमान आमदारांची भूमिका काय असेल याची चर्चा होताना दिसत आहे.