पुण्यात पूरस्थिती ओढवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमुख नाना भानगिरे यांनी दोन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने पुणे शहरातील पूरग्रस्त भागातील घरांमधून गाळ चिखल काढण्यास युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली असून बाधित घरांच्या स्वच्छता मोहिमेच्या कामाने वेग पकडला आहे, शहरातील एक हजार बाधित घरांच्या सदस्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबरोबरच पुणेकरांना मदत करण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून स्वतंत्र मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
पुण्यात पूरस्थिती ओढवल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे साहेब यांनी घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत परिस्थितीची माहिती घेण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना फोन करत करीत तत्काळ विविध खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून स्वयंसेवकांची टीम पाचारण करण्यात आली, घराघरात साचलेला चिखल काढणारे स्वच्छता कर्मचारी, गाळ उपसण्याचे काम करणारे स्वयंसेवक,स्वच्छ पाण्याच्या वॉटर जार, एक हजार बाधित घरांच्या सदस्यांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा, स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भोजन व्यवस्था, पूरस्थितीमुळे नष्ट झालेली कागदपत्रे बाबत मदत कक्ष, शालेय पुस्तके,गणवेश वाटप तसेच तातडीची वैद्यकीय मदत, दुर्गंधीयुक्त कचरा उचलणारे स्वयंसेवक, स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना उबदार कपडे, ज्येष्ठ नागरिकांना मदतनीस, अशी संपूर्ण यंत्रणाच कार्यान्वित करून पूरग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी पुणे शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना थेट घटनास्थळी पोहोचत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कार्यरत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या मदतकार्यात शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनेच्या सदस्यांनी सहभाग घेतला.