पुणे

पी.एम.पी.एम.एल’च्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित, अध्यक्षा दिपा मुधोळ यांच्या विनंतीला नाना भानगिरे यांचा प्रतिसाद

मागील काही दिवसांपासून सातत्याने मागणी करुन देखील, ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमधील’ कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची प्रशासनाकडून पुर्तता करण्यात येत नसल्याने, प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांचा कृती समितीने हडपसर येथील गाडीतळापासून कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले होते, अध्यक्ष दिपा मुधोळ यांच्या विनंतीवरून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

 

सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब देण्यात कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, ६ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती देणे, वारंवार मागणी करूनदेखील न्याय मागण्या मान्य न केल्यामुळे, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सर्व संघटनांनी एकत्र येऊन प्रमोद नाना भानगिरे यांचे अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन केली होती, या कृती समितीच्या माध्यमातून मागण्यांचे पत्र दिले होते, पत्राची दखल पुणे महानगर परिवहन लिमिटेडच्या प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. मागण्या मान्य होत नसल्याने, अखेरचा पर्याय म्हणून पी.एम.पी.एम‌.एल. चे कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला,

पुणे महानगर परिवहन लिमिटेडच्या बससेवांचा फायदा दररोज पुण्यातील लाखो नागरिक घेत असल्याने संपामुळे प्रवाशांचे हाल झाले,
या आंदोलनास पुणे शिवसेनेने पाठिंबा दिला होता, या आंदोलनाची तातडीने दखल घेत पीएमपीएमएल च्या अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ – मुंडे यांनी नाना भानगिरे यांना लेखी पत्र देऊन संचालक मंडळाची बैठक घेऊन या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आंदोलन स्थगित झाल्याने पीएपी बसेस सुरळीत सुरु झाल्या व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

 

सहा वर्षापासून पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असून वारंवार मागणी करूनही त्या पूर्ण केल्या जात नाहीत, लेखी पत्र देऊनही दखल न घेतल्याने संपाचा मार्ग पुकारला परंतु अध्यक्ष दीपा मुधोळ यांनी विनंती केल्याने आंदोलन स्थगित केले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रमोद नाना भानगिरे
शिवसेना
शहरप्रमुख पुणे