नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारच्या वतीने महाराष्ट्राला सावत्र वागणूक देण्यात आली आहे. एकीकडे बिहारला ६० हजार कोटी, आंध्रप्रदेशला १५ हजार कोटी रुपयांची खैरात वाटली जात असताना महाराष्ट्राचं ताट मात्र रिकामंच ठेवले गेले.
संपूर्ण अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा एकदाही उल्लेख नसलेला इतिहासातील हा कदाचित पहिलाच अर्थसंकल्प असेल.
महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी असून महाराष्ट्रावर झालेला हा अन्याय सहन करणार नाही. महाराष्ट्राला मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या आंदोलनात “महाराष्ट्राच्या गद्दारांना, धडा शिकवू लाचारांना, महाराष्ट्राला लुबाडून बिहारची झोळी भरली भाजपची लबाडी आता आम्हाला कळली, महाराष्ट्राचे गद्दार करू हद्दपार” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह किशोर कांबळे, शेखर धावडे, मृणाल वाणी, सुरेखाताई धमिष्टे, नीताताई गलांडे, पूजा काटकर, मीनाताई पवार, अप्पा पवार, स्वाती चिटणीस, शैलेंद्र राजगुरू, गणेश नलावडे, रमीज सय्यद तसेच मोठ्या संख्येन कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय अर्थसंकल्पात काय झालं आपण सर्वांनी बघितलं…
बिहार अन् आंध्रप्रदेशला खैरात वाटली जात असताना महाराष्ट्राचं ताट मात्र रिकामंच राहिलं.
देशाच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा ओतणाऱ्या महाराष्ट्राची झोळी रिकामीच ठेवण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांचा हिशोब आता विधानसभा निवडणुकीत करायचा आहे.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष