प्रतिनीधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर -कदमवाक् वस्ती येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घरा घरात पोहचावी यासाठी मा.अभिजित (पप्पु) बडदे यांच्या माध्यमातून व कार्यसम्राट सरपंच मा. चित्तरंजन (नाना) गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली. भगवा प्रतिष्ठाण, जय हिंद ग्रुप, व लहुजी शक्ती सेना, यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत फार्म भरण्याचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. महिलांना या योजनेचा पुरे पूर फायदा व्हावा ह्या दृष्टी कोनातून हे केंद्र ३१ ऑगस्ट पर्यंत रोज सकाळी ११.०० वाजल्या पासून संध्याकाळ पर्यंत चालू राहणार आहे. तरी सर्व माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केंद्रांची सुरवात गुरुवार दिनांक-११/०७/२०२४ पासून करण्यात आली आहे. या केंद्राचा मंगळवार दि.३०/७/२०२४ रोजी २० वा दिवस पूर्ण होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व माता भगिनिन पर्यंत पोहोचावी व लोकांची सेवा घडावी म्हणून स्वखर्चाने उभारलेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केंद्राचा माता-भगिनींना चांगला लाभ होताना दिसत आहे. तसेच अभिजित बडदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे की जर कोणी माता भगिनीं ह्या योजनेचा लाभ घ्यायच्या राहिल्या असतील तर त्यांनी कदम वाकवस्ती, पालखी तळ, पाण्याच्या टाकी शेजारी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या केंद्रावर संपर्क साधावा.