सिंहगड रोड व परिसरातील नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशातूनच उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, सामान्य नागरिकांचा हा उड्डाणपूल केवळ काही विशिष्ट नेत्यांच्या हातून उद्घाटन होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
सामान्य नागरिकांच्या यातनांकडे दुर्लक्ष करून केवळ काही नेत्यांची मर्जी सांभाळण्यात व्यस्त असणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करावा या मागणीसाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महानगरपालिका प्रशासन हाय हाय, खुला करा खुला करा उड्डाणपूल खुला करा अशा घोषणांनी संपूर्ण सिंहगड रोड परिसर दणाणून गेला होता.
दिनांक १२ ऑगस्ट पर्यंत हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला न केल्यास महाविकास आघाडीकडून दिनांक १३ ऑगस्ट रोजी उड्डाणपूल खुला केला जाईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सौ.अश्विनीताई कदम, काकासाहेब चव्हाण, सौ.मृणालताई वाणी, पोपटराव खेडेकर, गणेश नलावडे, शशीकांत तापकीर, सौ.राजश्रीताई पाटील, अमोघ ढमाले, भक्ती कुंभार, रोहन पायगुडे, समीर पवार, अमोल ननावरे, बाळासाहेब रायकर, अभिजित बारावकर, रमीज सय्यद आदि पदाधिकारी आणि मोठया संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.