महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे वंदन करून आज पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची “शिवस्वराज्य यात्रा” सुरू होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा कल्याणकारी विचार घेऊन महाराष्ट्रातील जनतेसोबत संवाद साधण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही राज्यव्यापी यात्रा सुरू झाली आहे. या शिवस्वराज्य यात्रेचे उद्या दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी पुणे शहरात आगमन होणार असून शहरातील 5 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा मार्गस्थ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनेक ठिकाणी यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
शिवस्वराज्य यात्रेचा मार्ग खालील प्रमाणे :
शनिवार, दिनांक १० ऑगस्ट २०२४
दुपारी ०२: ०० – हडपसर विधानसभा – नेताजी सुभाषचंद्र मंगल कार्यालय, हडपसर ( जाहीर सभा )
सायंकाळी ५.३० : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गोळीबार मैदान चौक
सायंकाळी ६ : वेगा सेंटर, स्वारगेट
सायंकाळी ६.३० : दांडेकर पूल सिग्नल, सिंहगड रस्ता
सायंकाळी ६.३० : वीर बाजी पासलकर स्मारक, राजाराम पूल
सांयकाळी ०७:०० – नवले लॉन्स
(जाहीर सभा )
सायंकाळी जाहीर सभा होणार असून या सभेत शिवस्वराज्य यात्रेचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप, हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रविण तुपे यांनी दिली.