हडपसर पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉ.मारुतराव आबनावे (संचालक – नोबेल हॉस्पिटल, हडपसर, पुणे), यांच्या शुभहस्ते सुलतान खान ( सरचिटणीस – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी), यांच्या अध्यक्षतेखाली दत्तोबा जांभुळकर सरपंच – वानवडी गाव ट्रस्ट, विजय जाधव ( माजी शक्षण मंडळ – पुणे म.न.पा.) माजी राज्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे सर, प्राचार्य लहू वाघुले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुलतान खान यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या वा भारताचा झेंडा हा केवळ कापड नाही तर अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाची साक्ष आहे, असे सांगून शिक्षण हे मुल्यशिक्षणावर आधारित असावे, असे सांगितले. आई वडिलांचा योग्य सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून हिंदू मुस्लिम एकोपा वा शेजारधर्म पाळणे गरजेचे आहे, त्यातूनच बलवान भारत निर्माण होईल असेही सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर मारुतराव आबनावे यांच्या कार्याचा गौरव करून साधी राहणी व उच्च विचार असलेले, कर्तृत्वान, बुद्धिवान, विचारवंत गुरु म्हणून लाभले हे आमचे भाग्य आहे, असे सांगितले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.याप्रसंगी देशभक्तीपर गीत सादर केलेल्या इयत्ता ८ वित शिकत असलेल्या कृष्णा थोरात या विद्यार्थ्यास रोख १००० रुपयाचे बक्षीस दिले.
ॲड. प्रभाकर शेवाळे यांनी आपल्या भाषणात 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडण्यात आला याचा इतिहास सांगून भारताच्या तिरंगी ध्वजाच्या निर्मितीचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला.
डॉ.मारुतराव आबनावे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मोठी स्वप्ने पहा, संकटाना घाबरून थांबू नका, सतत प्रयत्नशील रहा, असा मोलाचा संदेश दिला.
याप्रसंगी इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी एकूण 88,500 रुपयांची रोख रकमेची पारितोषिके वितरित करण्यात आली.तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत गणवेश वाटप करण्यात आले.याप्रसंगी सोनाली शिवरकर, गौरी शिवरकर, अभिजित शिवरकर व गौतम रासकर यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले.
याप्रसंगी डॉ.मारुतराव आबनावे सर यांचा परिचय श्रद्धा ससाणे यांनी केला.तसेच विद्यालयातील शिक्षिका दीपा व्यवहारे यांची पुणे जिल्हा हिंदी अध्यापक सभेच्या शहर सचिव पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव चंद्रकांत ससाणे सर, माजी नगरसेविका कविताताई शिवरकर, तसेच मायाताई ससाणे,सोनाली परदेशी, दीपा जांभुळकर, सिद्धार्थ परदेशी,सिद्धांत परदेशी, अजिंक्य शिवरकर, सोपानराव गवळी, रमेश काकडे, कुंडलिक गवळी, विजय कोद्रे, ॲड. विजय राऊत, सूर्यकांत देडगे, नेवसे, सुरेश शिवरकर, मनोज शिवरकर, किशोर शिवरकर, रामभाऊ जगताप, यशवंत झगडे, अशोक शिवरकर, बाळासाहेब टिळेकर, अजय गिरमे, दीपक केदारी, रहमान शेख, दत्ता डुरे, नवाब भाई, अविनाश झोडगे, मनोज खंडेलवाल, अकबर शेख, स्टीफन सर, बाळासाहेब हिंगणे, लव्हे सर, दत्तात्रय शिवरकर, सतिश गिरमे, सचिन गिरमे, गणेश गिरमे, दिलीप गुप्ता, किशोर शिंदे, राजा आण्णा शिंदे, हेमंत वाडकर, अमृतराव हरपळे, बापू रासकर, चाँदभाई, महेंद्र तिडके, गणेश शिवरकर, रमेश गायकवाड, नरके दाजी, बुलबुले, प्रशांत जाधव, अल्ताफ शेख, सुभाष जांभूळकर, दत्ता शिवरकर, उमेश शिवरकर, शंभू जांभूळकर, प्राचार्य लहू वाघुले सर, ग्रामस्थ, पालक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा व्यवहारे यांनी व आभार प्रदर्शन सुनिल गायकवाड (माजी चेअरमन : सन्मित्र सहकारी बँक) यांनी केले.