पुणे ः कुटुंबीयांना जीवे मारण्याची आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. नरसिंह बाळासाहेब शिंगाडे (वय २३, रा. दिघी, ता. कर्जत, जि. नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना जून २०२० ते २६ जून २०२४ दमर्यान घडली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने २०२० जून ते २६ जून २०२४ दरम्यान दिघी (ता.कर्ज., जि. नगर)पासून जवळ असलेल्या लॉज, शेतात, मित्राच्या घरी नेऊन शरीर संबंध ठेवले. घरच्यांना जीवे मारण्याची, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करून शरीरसंबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे करीत आहेत.