पुणे (प्रतिनिधी)
लोककल्याण प्रतिष्ठानची लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजना आणि सायकल वाटप उपक्रम गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठा आधार देणारा असून या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाचा लोककल्याण प्रतिष्ठाण आधारवड आहे असे प्रतिपादन श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी तुकाईदर्शन येथे बोलताना व्यक्त केले, लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षाप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांसाठी लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजना आणि सायकल वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी रासकर बोलत होते.यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,शैक्षणिक फी,युनिफार्म,आणि सायकल यांचे वाटप विकास रासकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सातत्याने काम करताना कोरोना सारख्या प्रतीकूल काळातही लोककल्याण प्रतिष्ठान जनसामान्यांच्या पाठीशी उभे राहिले,प्रतिष्ठानची विद्यार्थी दत्तक योजना आणि इतर उपक्रमाद्वारे गरजू गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ दिले नाही याचे समाधान आम्हाला असल्याचे अध्यक्षस्थानावरुन बोलताना लोककल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी सांगितले.
सन २०२४ -२५ शैक्षणिक वर्षासाठी लोककल्याण विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत पार्थ लोळे इ.११वी सायन्स,सिध्दी देडगे इ.१२ वी सायन्स,अनिकेत भिसे एस.वाय.बी.कॉम.हे लाभार्थी विद्यार्थी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य उत्तमराव नेवसे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले,इंद्रपाल हत्तरसंग,राजाराम गायकवाड,तुकाराम घोडके चंद्रकांत वाघमारे,अविनाश गोडसे,पांडुरंग शेंडे,प्रविण होले,राजू कौले,वसंत कुंभार देविदास प्रधान,अशोक राजीवडे,प्रसाद होले,आदित्य साबळे आदिंसह बहुसंख्य,विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप भामे,प्रास्ताविक प्रा.एस.टी.पवार यांनी तर आभार हरीश्चंद्र कुलकर्णी यांनी मानले.