लांडेवाडी-नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल फुलगाव येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत न्यू इंग्लिश लांडेवाडीच्या १४ वर्षीय मुलांच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. विद्यार्थ्यांच्या या यशाची विशेष दखल घेत श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पुणे म्हाडाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा येथे दि. २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील १३२ संघांमधून १००० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अगदी सुरुवातीच्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत आपला खेळ उंचावर ठेवून न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी च्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार क्रिकेटचे प्रदर्शन घडवून प्रेक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेतील विजेता न्यु इंग्लिश स्कुल लांडेवाडी शाळेचा संघ पुढीलप्रमाणे.
१) दीप सौरभ गुजराथी(कर्णधार)
२) साई नागेश मेहेर(उपकर्णधार)
३) ढोरे अर्णव सुनील
४) मित वैभव पटवा
५) हर्ष हनुमंत पानसरे
६) तनवीर अन्वर पठाण
७) शौर्य निलेश वाडेकर
८) यशराज सचिन मोढवे
९) आदित्य राजहंस मोरे
१०) कारण सचिन दरेकर
११) आर्यन शाम गुंजाळ
१२) आर्यन राजेंद्र खैरनार
१३) अर्णव किशोर वागज
१४) यश सचिन पोळ
या स्पर्धेमध्ये कु.दीप सौरभ गुजराथी याने सर्वाधिक धावा करून उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवून संघाला विजय प्राप्त करून दिला. सर्व विजेत्या खेळाडूंचे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, लांडेवाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार तथा पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, संस्थेच्या प्रशासन अधिकारी शामल चौधरी, न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शबनम मोमीन, उपप्राचार्य रजनी बाणखेले यांनी कौतुक करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक तुषार काळे, देवा मटाले, ऋषिकेश खोमणे, तेजश्री शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.