पुणेमहाराष्ट्र

पुण्यातील सर्वाधिक गर्दी खेचत, प्रचंड उत्साहात धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी दिमाखात साजरी..!! सामाजिक भान जपत एकनाथ शिंदे फाऊंडेशन व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने पूरग्रस्तांना लाखोंचे अर्थसाह्य प्रदान

(पुणे) – शहरातील सर्वात लोकप्रिय असलेली धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. हडपसरच्या श्रीराम चौकात या दहिहंडीचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यातर्फे करण्यात आले होते‌. सात लाखाहुन अधिक रक्कमेची रोख बक्षिसे देणारी दहिहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी प्रसिद्ध आहे. मोठे ढोलपथक, आणि उत्कृष्ट आधुनिक अशी डॉल्बी ध्वनी यंत्रणा यामुळे कोणताही सेलिब्रिटी दहीहंडीला हजेरी लावत नसताना, पुण्यात सर्वात जास्त गर्दी खेचणारी दहिहंडी म्हणूनही धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी प्रसिद्ध आहे. राज्यभरातून आलेल्या गोविंदा पथकांपैकी मुंबईतील अण्णाभाऊ साठे तरुण सेवा मंडळ गोविंदा पथकाने दहिहंडी फोडत ७ लाख १७ हजार १७१रूपयांचे बक्षीस पटकावले यावेळी वातावरणात मोठा उत्साह संचारला होता.सर्वत्र श्रीकृष्णाची गाणी वाजवली जात होती.गोविंदा पथकाचा उत्साह वाढवणाऱ्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता.*

 

यावेळी शिवसेना नेत्या,विधानपरीषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग तसेच संसदिय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटिल, विधानपरीषद आमदार योगेश टिळेकर,हडपसर आमदार चेतन तूपे आदि मान्यवर उपस्थित होते.
*यावेळी जूलै महिन्यात शहरात आलेल्या पुरात प्रियंका कुंभार यांचे पती वाहुन गेले, आणि वृक्ष अंगावर पडुन अंजली पाटील यांच्या पतीचे दुर्देवी निधन झाल्यामुळे, आणि त्यांना अद्याप कोणतेही अर्थसाह्य न मिळाल्याने, त्यांचा कुटुंबियांना तत्काळ अर्थसाह्य करण्यात आले. कुंटुंबियांचा मोठा आधार गेल्याने प्रियंका कुंभार आणि अंजली पाटिल परिवारास मदतीची नितांत गरज होती.

ही गरज ओळखुन पुण्यातील सर्वात लोकप्रिय धर्मवीर आनंद दिघे दहिहंडीचे औचित्य साधत शिवसेना नेत्या, विधानपरीषद उपसभापती नामदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते, एकनाथ शिंदे फाऊंडेशन व शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यातर्फे प्रत्येकी एक लाखाचे स्वखर्चातून आर्थिक साह्य करण्यात आले‌. सामाजिक भान जपत केलेल्या केलेली मदत ही स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.