लोणी काळभोर- ( कदमवाक वस्ती) येथे मांग गारुडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रम घेण्यात आला.
३१ ऑगस्ट १९१८ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज यांनी मांग गारुडी समाजाची गुन्हेगार हजेरी बंद केली त्यानिमित्ताने “”मांग गारुडी मुक्ती दिन सोहळा”” कदम वाक वस्ती पालखी स्थळ येथे साजरा कऱण्यात आला आहे.हया कार्यक्रमाच्या वेळी श्री विजय बोडके यांना संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष पद देण्यात आले. तसेच अनेक संघटनेतील पदे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाच्या वेळी समाज कल्याण आयुक्त मा श्री विशाल लोंढे, संघटनेचे संस्थापक रामचंद्र सकट, व राष्ट्रीय अध्यक्ष हरीश सकट हे उपस्थित होते.
याच बरोबर प्रदेशाध्यक्ष केशव भाऊ, संघटनेचे सचिव दादू सकट,कार्याध्यक्ष राजेश लोंढे,संपर्क प्रमुख बाळासाहेब राखपसरे उपस्थित होते.
कदमवाक वस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड,उपसरपंच नाशीर पठाण ,तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे,ल.श.सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट,ज्ञानेश्वर नामगुडे, अमोल टेकाळे,शिवसेना संघटक निलेश काळभोर, आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विजय राखपसरे यांनी केले.