चिपळूण/ प्रतिनिधी: (विलास गुरव) चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून नांदिवसे ग्रामपंचायत कार्यालय इमारत व विविध विकास कामे भूमीपुजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
अनेक वर्ष ग्रामपंचायत इमारत सुसज्ज व मोठी व्हावी असे सर्वच ग्रामस्थांचे स्वप्न होते.ग्रामपंचायत चालवताना जागा कमी असल्याने कार्यालयीन कामे करणे खूप अडचणीचे ठरत होते.रस्त्यांची कामे होणे सुद्धा अत्यंत गरजेचे होते.ग्रामस्थांच्या या मागणीचा व अडचणी,गरज लक्षात घेता नूतन ग्रामपंचायत इमारत मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार श्शेखरजी निकम यांचे आभार मानले
यावेळी आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना आनंद व्यक्त केला व झालेल्या विकास कामे व मंजूर झालेल्या विकास कामाचा सविस्तर आढावा घेतला तसेच उर्वरीत विकास कामांची माहिती घेतली.यावेळी श्री.प्रकाश शिंदे यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले कि या आदी जे कोणाला जमलं नाही असा विकास आमदार महोदयांनी केला आहे.सरपंच सौ.सायली शिंदे यांनी आमदार महोदय यांचे आभार मानले कारण त्यांच्या माध्यमातून गावात होत असलेला विकास अविस्मरणीय आहे.
यावेळी गट विकास अधिकारी उमा पाटील,दिलीप चव्हाण,घाग साहेब,केळस्कर साहेब,सरपंच सायली शिंदे,उपसरपंच संतोष शिंदे,नारायण सकपाळ,शशिकांत शिंदे,जयंतराव शिंदे,प्रकाश शिंदे,अभिनंदन शिंदे,रोहिणी देवरुखकर,विजया पालांडे,नितीन शिंदे,नीता पडयाळ,नरसिंगराव शिंदे,तुकाराम गायकवाड,भरत अण्णा,रमेश दादा,सदाशिव जंगम,चंद्रकांत सुर्वे,बाबा शिंदे,अशोक शिंदे,राजाभाऊ,राजेश जाधव,गायकवाड,सर्व जाधव परिवार,सुनिल शिंदे,पोलीस पाटील,वसंत शिंदे,वसंत जाधव,माजी सरपंच अश्विनी शिंदे,नितीन पड्याल,अनिकेत शिंदे,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आरोग्य सेविका व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.